पर्यटकांसह नागरिकांना मोठा दिलासा! केळघर घाट अखेर सर्व वाहतुकीसाठी खुला; सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय
पांचगणी न्यूज नेटवर्क मेढा : सततच्या मुसळधार पावसामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून बंद करण्यात आलेला महाबळेश्वर-मेढा-सातारा रस्त्यावरील प्रसिद्ध केळघर घाट आता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. घाट परिसरातील पावसाचा जोर ओसरल्याने आणि प्रत्यक्ष पाहणीनंतर हा मार्ग सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्याने सार्वजनिक बांधकाम उपविभागाने हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्र जावळी उपविभागाने तहसीलदारांना…