Home » पांचगणी » पाचगणी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा पूर्वनियोजितच; सर्वांना संधी देण्यासाठीच गोळे यांचा राजीनामा : नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांचे स्पष्टीकरण

पाचगणी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा पूर्वनियोजितच; सर्वांना संधी देण्यासाठीच गोळे यांचा राजीनामा : नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांचे स्पष्टीकरण

पांचगणी न्यूज नेटवर्क
​पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे यांनी दिलेल्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर शहरात राजकीय चर्चांना उधाण आले असतानाच, यावर नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता स्थापन करताना ठरलेल्या धोरणानुसारच झाल्याचा खुलासा नगराध्यक्ष बगाडे यांनी केला आहे.
​नगरपरिषदेत सत्ता स्थापन करताना सर्व सहकाऱ्यांना कामाची संधी मिळावी, या उद्देशाने उपनगराध्यक्षपद हे दर सहा महिन्यांनी बदलण्याचे आधीच निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार प्रकाश गोळे यांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी स्वेच्छेने आणि ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांच्याकडे सोपवला आहे. त्यामुळे या राजीनाम्यामागे कोणतेही अंतर्गत मतभेद नसून ही एक पूर्वनियोजित राजकीय प्रक्रिया असल्याचे बगाडे यांनी स्पष्ट केले.

​प्रकाश गोळे यांनी आपल्या कार्यकाळात शहराच्या विकासकामांना गती देण्याचे काम केले असून, आता रिक्त झालेल्या उपनगराध्यक्षपदावर लवकरच पक्षाच्या धोरणानुसार नव्या नगरसेवकाची निवड करण्यात येणार आहे. नगराध्यक्षांच्या या अधिकृत खुलाशामुळे गेल्या २४ तासांपासून पाचगणीच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या सस्पेंसाला पूर्णविराम मिळाला आहे. आगामी काळात उपनगराध्यक्षपदाची ही माळ सत्ताधारी गटातील कोणत्या सहकाऱ्याच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers