Home » जावळी » पेन्शन वाढ संदर्भात जावळीतील सेवानिवृत्तीचे श्री. छ. खा. भोसले यांना निवेदन….

पेन्शन वाढ संदर्भात जावळीतील सेवानिवृत्तीचे श्री. छ. खा. भोसले यांना निवेदन….

 

पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप
सातारा : ई पी एस -९५राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत व इतर राष्ट्रीय पदाधिकारी यांच्या सूचनेनुसार सातारचे भाजप खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची आज ईपीएस ९५ संघटनेचे जावळी तालुकाध्यक्ष श्री बापूसाहेब जगताप यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली व वाढीव सेवानिवृत्ती वेतन मिळावे. अशी मागणी करण्यात आली.
नवी दिल्ली येथील संसद भवन मध्ये देशातील विविध प्रश्नांच्या बाबत दिल्लीत दि.२० जुलै ते १३ ऑगस्ट पर्यंत संसद मध्ये पावसाळी अधिवेशन होत आहे.या अधिवेशनात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करावी या संदर्भातील विषय महत्वपूर्ण आहे. वाढती महागाई, वयोमानानुसार होणारा आजार व त्याच्या वरील औषध उपचार आणि इतर कारणामुळे सध्या मिळणारे सेवानिवृत्ती वेतन कमी आहे. सर्वच कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झालेली आहे ही आनंदाची बाब आहे. त्याच धर्तीवर ती ए पी एस ९५ संघटनेच्या मागणीनुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ व्हावी. आर्थिक दिलासा मिळावा. याचा विचार करून सातारचे भाजप खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी याबाबतचा संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करावा. त्यांच्या शब्दाला देशात वजन आहे. सामान्य माणसांचे प्रश्न ते तातडीने सोडवतात. याचा अनुभव अनेकदा सातारा जिल्ह्याने घेतला आहे. यासाठीच जावळी तालुक्याच्या संघटनेच्या वतीने जलमंदिर या त्यांच्या कार्यालयात मंगळवार दिनांक १४ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता जावळी तालुक्याच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी भेट घेतली. त्यांना लेखी निवेदन सादर केलेले आहे.
.

या वेळी भाजप खासदार श्री .छ. उदयनराजे भोसले यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांच्या मध्ये समाधान पसरले आहे. यावेळी निवेदन देताना ए पी एस ९५ चे राष्ट्रीय संघर्ष समिती जावळी तालुकाध्यक्ष बापूराव जगताप, संघटक जयवंत मोरे ( मामा),अनिल जगताप,सुधीर देशमुख,भरत पवार, चंद्रकांत कदम, तुकाराम जुनघरे, किसन जवळ, भीमराव सपकाळ,बाळकृष्ण देशमुख इत्यादी पदाधिकारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी झटणारे दुदुस्करवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश शंकर मोरे उपस्थित होते.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers