दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालयाच्या गुणवत्तेच्या परंपरेत आणखी एक मानाचा तुरा; सार्थक गोळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
पांचगणी न्यूज नेटवर्क दापवडी :कोयना एज्युकेशन सोसायटी तळदेव संचलित, दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालय दापवडी (ता. जावळी, जि. सातारा) या विद्यालयाने आपल्या उच्च गुणवत्तेची परंपरा कायम राखत शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा एकदा दिमाखदार कामगिरी केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयाचा गुणवान विद्यार्थी कु. सार्थक अमोल गोळे याने ‘शिष्यवृत्ती’ प्राप्त करून संस्थेच्या व…