Home » पांचगणी » मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा; उद्या पांचगणी बंदची हाक

मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा; उद्या पांचगणी बंदची हाक

पांचगणी न्यूज नेटवर्क

पांचगणी : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. ‘कुणबी’ नोंदी असलेल्या मराठा समाजाला त्यांच्या वंशावळीच्या आधारे ओबीसी (OBC) प्रमाणपत्रे मिळावीत आणि ही प्रमाणपत्रे ‘हैदराबाद गॅझेट’नुसार दिली जावीत, या मागण्यांसाठी त्यांनी हे उपोषण सुरू केले आहे.

दरम्यान मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या पांचगणी बंदची हाक दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला सकल मराठा बांधवांकडून तसेच पांचगणी व्यापारी असो वतीने उद्या पांचगणी बंदची हाक देण्यात आली आहे. तशा परवानगीचे निवेदन पांचगणी पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.

पांचगणीतील व्यापारी, व्यावसायिक आणि दुकानदारांनी एक दिवस आपली दुकाने व व्यवसाय बंद ठेवून आंदोलनाला समर्थन द्यावे, असे आवाहन जरांगे यांच्या समन्वयकांकडून करण्यात आले आहे. उद्या सर्व व्यापारी आणी मराठा समाजाच्या वतीने सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला पाठींबा देण्यात येईल अशी ही माहिती समन्वयकांनी दिली आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers