Home » पांचगणी » महाबळेश्वर तालुक्यातील खिंगर येथे ‘गोल्डन हार्ट केअर व वेलनेस क्लब’चे थाटात उद्घाटन ​आरोग्य हीच खरी संपत्ती; नियमित व्यायामातून निरोगी जीवनशैलीचा संदेश

महाबळेश्वर तालुक्यातील खिंगर येथे ‘गोल्डन हार्ट केअर व वेलनेस क्लब’चे थाटात उद्घाटन ​आरोग्य हीच खरी संपत्ती; नियमित व्यायामातून निरोगी जीवनशैलीचा संदेश

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पांचगणी : बदलत्या जीवनशैलीत आणि धावपळीच्या युगात नागरिकांना सुदृढ आरोग्याचा मार्ग दाखवण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील निसर्गरम्य मौजे खिंगर येथे ‘गोल्डन हार्ट केअर व वेलनेस क्लब’चा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. परिसरातील नागरिकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करणे, शारीरिक सुदृढता वाढवणे आणि आरोग्याविषयी व्यापक सजगता निर्माण करणे या उद्देशाने या आधुनिक वेलनेस सेंटरची उभारणी करण्यात आली आहे.

​या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आरोग्य सल्लागार सौ. शुभांगी आंब्राळे मॅडम यांनी आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. “आरोग्य हीच मानवी जीवनातील खरी धनसंपदा आहे. आजच्या मानसिक ताणतणावाच्या आणि व्यस्त दिनक्रमात प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या शरीरासाठी वेळ काढून नियमित व्यायाम केला पाहिजे. संतुलित आहार आणि योग्य जीवनशैलीचा अवलंब केल्यासच आपण निरोगी आयुष्य जगू शकतो,” असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

​या कार्यक्रमास जागतिक आरोग्य सल्लागार मा. सौ. मनीषा बर्गे मॅडम व मा. मंगेश बर्गे सर यांच्यासह मा. सौ. उज्वला पवार मॅडम आणि मा. श्री. किरण पवार सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून खिंगरसारख्या ग्रामीण व पर्यटन परिसराच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा दर्जाचे वेलनेस सेंटर सुरू झाल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. या केंद्रामुळे स्थानिक ग्रामस्थांसोबतच पर्यटकांनाही आरोग्यविषयक मार्गदर्शनाचा लाभ घेता येणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

​याप्रसंगी आंब्रळचे उपसरपंच भानुदास बिरामणे, शशिकांत भिलारे सर यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामस्थ आणि आरोग्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​नवीन सुरू झालेल्या ‘गोल्डन हार्ट केअर व वेलनेस क्लब’च्या माध्यमातून नागरिकांना दररोज शास्त्रीय पद्धतीचा व्यायाम, वजन नियंत्रण, आहाराबाबत वैयक्तिक मार्गदर्शन आणि निरोगी जीवनशैलीचे धडे मिळणार आहेत. ग्रामीण भागात आरोग्यविषयक जागृती निर्माण करणारा हा उपक्रम खिंगर आणि आसपासच्या संपूर्ण परिसरासाठी अत्यंत प्रेरणादायी आणि वरदान ठरणार आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers