वायर केबल चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना वाई पोलिसांकडून पोलिसी खाक्या; तांब्याची तार विकताना रंगेहात अटक
पांचगणी न्यूज नेटवर्क / चंदू भोई वाई : सिद्धनाथवाडी परिसरातील सोसायट्या आणि शेतीपंपांच्या मोटारींची केबल चोरी करून त्यातील तांबे विकणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांच्या वाई पोलिसांनी आवळल्या मुसक्या आहेत. संशयित आरोपींना तांब्याची तार विकताना रंगेहात पकडून त्यांच्याकडून गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. तारांगण सहकारी गृहनिर्माण सोसायटी, सिद्धनाथवाडी (वाई) येथील पार्किंगमध्ये बसवलेली सुमारे १०० मीटर…