पांचगणी न्यूज नेटवर्क
मेढा :- स्वतंत्र भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन मामुर्डी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी मामुर्डी येथे ध्वजवंदन करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजवंदन नुकताच भारतीय सैन्य दलात अग्नी वीर म्हणून भरती झालेला कुमार आदित्य सुषमा अंकुश शेलार यांचे हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर श्री केदारेश्वर विकास मंडळ मामुर्डी (नवी मुंबई ) यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रज्ञाशोध परीक्षा,शिष्यवृत्ती परीक्षा तसेच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना टिफिन बॉक्स देणेत आले तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर,स्वेटर, कंपास व इतर शैक्षणिक साहित्य ही देण्यात आले. शाळेतील मुलांना दुपारी भोजन करनेसाठी आनंद शेठ यांनी ताटे ( फ्लेट ) देण्यात आल्या . मंडळा तर्फे शाळेमध्ये ज्ञानार्जन करणाऱ्या शिक्षकांना शाल श्रीफळ व स्वतःचा फोटो व शाळेचा फोटो प्रिंट असलेला काॅफी मग,भेट देण्यात आला.
श्री केदारेश्वर विकास मंडळ मामुर्डी ( नवी मुंबई ) यांच्या वतीने शाळेच्या गुणवत्ता विकासासाठी दरवर्षी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सालाबादप्रमाणे आयोजित केला जातो
जिल्हा परिषद शाळेचं आपण काहीतरी देणं लागतो म्हणून केंद्रप्रमुख आनंदा शेलार व माजी मुख्याध्यापक अंकुश शिंदे यांनी फुलं ना फुलाची पाकळी म्हणून शाळेस आर्थिक मदत केली
सदर कार्यक्रमाला मामुर्डीचे सरपंच जगन्नाथ धनावडे,जावली सहकारी बॅंकेचे संचालक विश्वनाथ धनावडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय धनावडे, उपाध्यक्ष बजरंग चौधरी,श्री केदारेश्वर विकास मंडळ चे अध्यक्ष प्रशांत धनावडे,दानशूर व्यक्तिमत्व आनंद शेठ धनावडे, मंडळाचे उपाध्यक्ष विलास धनावडे व विजय धनावडे, मंडळाचे सचिव महेश धनावडे,समाजसेवक प्रफुल्ल धनावडे, माजी केंद्रप्रमुख संपतराव धनावडे,विजय भिलारे, तुकाराम ( बापु )धनावडे, सेवानिवृत्त पोलीस पाटील सुरेश धनावडे,नवनाथ धनावडे, अमोल भिलारे,बाजीराव धनावडे, जावली बँक कर्मचारी वसंतराव धनावडे, रामभाऊ धनावडे, विकास धनावडे, शांताराम धनावडे, पांडुरंग धनावडे, ज्ञानेश्वर धनावडे,विनोद सावंत, गणपत धनावडे, मंगेश धनावडे, केंद्रप्रमुख आनंदा शेलार,माजी मुख्याध्यापक अंकुश शिंदे, मुख्याध्यापीका शशिकला रघुनाथ दळवी, शिक्षक धोंडीबा मोरे, तुकाराम शेलार, शिल्पा कारंजकर, सुमन धनावडे,सविता धनावडे, आरती बिरामणे, पुजा चिकणे,सुजाता धनावडे, सुवर्णा शेलार तसेच ग्रामस्थ, पालक उपस्थित होते.
तसेच श्री केदारेश्वर विकास मंडळाचे माजी अध्यक्ष राजेंद्र धनावडे, सुभाष प्रकाश धनावडे,तुकाराम धनावडे, विनोद ( बंडु ) धनावडे, सचिन धनावडे,ज्ञानदेव (भाऊ ) धनावडे,दत्तात्रय राऊ धनावडे अरविंद धनावडे आदींनी स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. उपस्थितांचे स्वागत धोंडीबा मोरे यांनी केले आभार तुकाराम शेलार यांनी मानले



