Home » महाबळेश्वर » सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत चिखली शाळेचा डंका; मीत जाधव महाबळेश्वर तालुक्यात द्वितीय

सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत चिखली शाळेचा डंका; मीत जाधव महाबळेश्वर तालुक्यात द्वितीय

पांचगणी न्यूज नेटवर्क

​महाबळेश्वर:महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली (ता. महाबळेश्वर) येथील गुणवंत विद्यार्थी मीत विजय जाधव याने उत्तुंग यश संपादन केले आहे. मीतने गुणवत्ता यादीत स्थान मिळवत संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावून शाळेच्या व गावाच्या वैभवात मोलाची भर घातली आहे.

​मीत जाधव याने केवळ अभ्यासातच नव्हे, तर चालू शैक्षणिक वर्षात विविध वक्तृत्व स्पर्धांमध्येही आपल्या प्रभावी शैलीने अनेक पारितोषिके पटकावली आहेत. त्याच्या या सर्वंकष यशामागे शाळेचे मुख्याध्यापक विष्णू ढेबे, उपशिक्षक महेश पवार आणि सचिन जगताप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

​दुर्गम व ग्रामीण भागातील असूनही चिखलीच्या जिल्हा परिषद शाळेने शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा नेहमीच उच्च ठेवला आहे. चालू शैक्षणिक वर्षात शाळेचे एकूण तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले असून एका विद्यार्थिनीची निवड ‘नवोदय विद्यालया’साठी झाली आहे. शिष्यवृत्ती, नवोदय, विद्या निकेतन आणि सैनिक स्कूल प्रवेश परीक्षांमध्ये या शाळेने सातत्याने यशाची परंपरा कायम राखली आहे.

​मीत जाधव याच्या या घवघवीत यशाबद्दल महाबळेश्वरचे गटविकास अधिकारी विजय विभुते, गटशिक्षणाधिकारी प्रतीक कडू, केंद्र प्रमुख चंद्रकांत जंगम, दगडू ढेबे, संजय पार्टे, विनायक पवार, आनंदा शेलार, सर्जेराव बडे, अमोल कुंभार, प्रदीप दाभाडे, तसेच चिखलीच्या सरपंच दिपाली पवार, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा लता जाधव, संतोष जाधव, संपत जाधव, कोंडिबा जाधव आणि संतोष मोरे यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी व शिक्षणप्रेमींनी अभिनंदन करून त्याच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers