कराड-पाटण मार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; बेलदरे फाट्याजवळ भरधाव कारच्या धडकेत चितळीतील दुचाकीस्वाराचा करुण अंत!
पांचगणी न्यूज नेटवर्क कराड: कराड-पाटण मार्गावरील वाहतुकीचा थरार आणि वाढता वेग पुन्हा एकदा निष्पाप जीवासाठी काळ ठरला आहे. बेलदरे फाटा परिसरात शनिवारी सकाळी एका भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या भीषण धडकेत चितळी (ता. खटाव) येथील राजेंद्र जोती लोहार (वय ५८) या दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, कारने केवळ लोहार यांच्याच दुचाकीला…