
फलटण हादरले! खामगाव येथे विजेचा भीषण धक्का लागून एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू; एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात काळाचा घाला
पांचगणी न्यूज नेटवर्क फलटण : तालुक्यातील खामगाव येथे आज बुधवारी पहाटेच्या सुमारास एक अत्यंत मन सुन्न करणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. घराबाहेर पडलेल्या विद्युत वायरमधील प्रवाहाच्या संपर्कात आल्याने आणि एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण आणि हृदयद्रावक दुर्घटनेमुळे संपूर्ण खामगाव परिसरासह सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली असून, सर्वत्र












