जेसीबीतून शाही मिरवणूक! पांगारी जिल्हा परिषद शाळेत नवागतांचे ऐतिहासिक स्वागत
पांचगणी न्यूज नेटवर्क भोसे : शाळेचा पहिला दिवस म्हणजे पालकांची धावपळ आणि मुलांचे रडणे हे चित्र ठरलेले असते. मात्र, महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगारी येथे आज एक वेगळाच इतिहास रचला गेला. पहिल्याच दिवशी चक्क एका सुंदर सजवलेल्या ‘जेसीबी’मध्ये (JCB) बसवून नवख्या चिमुरड्यांची गावातून वाजत-गाजत शाही मिरवणूक काढण्यात आली! या कल्पक प्रयोगामुळे बच्चेकंपनीचा रडका…