भिलार

भिलारच्या हिलंरेज विद्यालयात अनोखे रक्षाबंधन; विद्यार्थ्यांनी वृक्षांना राखी बांधून दिला निसर्ग संवर्धनाचा संदेश

पर्यावरणरक्षणासाठी प्रत्येकाने एक झाड दत्तक घेण्याचे डॉ. तेजस्विनी भिलारे यांचे आवाहन ​पांचगणी न्यूज नेटवर्क /प्रमोद रांजणे भिलार : भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचा सण असलेला रक्षाबंधन केवळ मानवी नात्यांपुरता मर्यादित न ठेवता, निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा नवा पायंडा भिलार येथील हिलंरेज माध्यमिक विद्यालयाने पाडला आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिसर परिसरातील विविध वृक्षांना आकर्षक व पर्यावरणपूरक राख्या

भिलारच्या हनुमान मंदिरात सुरांचा नजराणा; ‘ॐ सोहम्’ संगीत विद्यालयात गुरुपूजनाचा भक्तिमय सोहळा

​‘पांचगणी न्यूज नेटवर्क ’ भिलार : पुस्तकांचे गाव म्हणून जगभरात ओळखल्या जाणाऱ्या भिलार (ता. महाबळेश्वर) येथे साहित्यासोबतच संगीत आणि अध्यात्माचा सुंदर संगम पाहायला मिळाला. येथील हनुमान मंदिर सभागृहात ‘ॐ सोहम्’ संगीत विद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या पुढाकारातून भव्य गुरुपूजन उत्सव भक्तिमय आणि अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. गुरु-शिष्य परंपरेचा सुरेल गौरव करणाऱ्या या सोहळ्याने उपस्थित

दारातच आला ‘वनराज’! पुस्तकांच्या भिलारमध्ये बिबट्याची डरकाळी; जननीमाता परिसरात उडाली प्रचंड खळबळ

पांचगणी न्यूज नेटवर्क /प्रमोद रांजणे भिलार : स्टॉल्सवर सजलेली रंगीबेरंगी पुस्तके, पर्यटकांची सलग ये-जा आणि गुलाबी थंडीने नटलेले ‘पुस्तकांचे गाव’ भिलार… पण याच भिलारच्या जननीमाता परिसरात मंगळवारी रात्रीच्या शांततेचा भंग करत थेट बिबट्यानेच ‘हजेरी’ लावली! जंगलाची सीमा ओलांडून हा वनराज थेट एका बंगल्याच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचल्याने भिलारसह संपूर्ण महाबळेश्वर-पाचगणी पट्ट्यात एकच खळबळ उडाली आहे. ​घडले असे

वीर मराठा प्रतिष्ठान’कडून स्वातंत्र्यदिनी उंबरीत २५० झाडांची लागवड

पांचगणी न्यूज नेटवर्क भिलार :  स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत निसर्गप्रेमी सुनील चंद्रकांत उंबरकर यांच्या वतीने आणी ‘वीर मराठा प्रतिष्ठान’च्या सहकार्याने उंबरी ता. महाबळेश्वर गावात भव्य वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमांतर्गत गावातील सार्वजनिक ठिकाणे, शाळा परिसर तसेच रस्त्यांच्या दुतर्फा तब्बल २५० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला ग्रामस्थ आणि तरुणांचा उत्स्फूर्त

भिलार-उंबरी रस्त्यावर रात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन; भिलार परिसरात भीतीचे वातावरण ​वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

पांचगणी न्यूज नेटवर्क ​भिलार : महाबळेश्वर आणि जावली तालुक्याच्या सीमावर्ती भागातील भिलार व परिसरात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. काल रात्री भिलारहून मेढा मार्गे भालेघरला जात असताना भिलार-उंबरी दरम्यान नागरिकांना बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. चालत्या वाहनातून बिबट्याची ही हालचाल कॅमेऱ्यातही कैद झाली असून, या घटनेमुळे भालेघर व भिलार परिसरातील नागरिक मोठ्या भीतीच्या छायेखाली

भिलारच्या वैभवात भर; अत्याधुनिक उपकरणांसह ‘श्रीराम फिटनेस’चा शुभारंभ ​युवा नेते नितीन भिलारे यांच्या हस्ते उद्घाटन; पुस्तकाच्या गावात आरोग्याचा नवा अध्याय

पांचगणी न्यूज नेटवर्क ​भिलार : जागतिक पटलावर ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून नावारूपाला आलेल्या भिलारमध्ये आता आरोग्यदायी आणि सुदृढ पिढी घडवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. गावातील तरुणाईला उत्तम शरीरसौष्ठव आणि फिटनेससाठी शहराच्या ठिकाणी धाव घ्यावी लागू नये, या उद्देशाने स्थानिक युवकांनी एकत्र येत ‘श्रीराम फिटनेस’ या अत्याधुनिक व जागतिक दर्जाच्या सुविधांनी सज्ज अशा व्यायामशाळेची

भिलार येथे बेंदूर सणाचे औचित्य साधून शेतकऱ्यांना मका बियाण्यांचे वाटप; पशुसंवर्धनाला मिळणार बळ

पांचगणी न्यूज नेटवर्क ​भिलार (प्रतिनिधी): ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेल्या शेती आणि पशुपालन व्यवसायाला अधिक भक्कम करण्यासाठी महाबळेश्वर पंचायत समिती व श्रीराम विविध कार्यकारी सेवा सोसायटी दूध डेरी लि. भिलार यांच्या संयुक्त विद्यमाने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. बेंदूर सणाचे औचित्य साधून भिलार परिसरातील शेतकऱ्यांना मोफत पशुखाद्य मका बियाण्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे दुग्ध

भाजप महिला मोर्चाच्या सातारा जिल्हा सरचिटणीसपदी वैशाली भिलारे यांची नियुक्ती

पांचगणी न्यूज नेटवर्क ​भिलार : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सातारा जिल्हा सरचिटणीस पदी वैशाली भिलारे यांची निवड करण्यात आली आहे. भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ. तेजस्विनी संग्राम घोरपडे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान केले. भिलारे यांच्या निवडीमुळे सातारा जिल्ह्यात, विशेषतः महाबळेश्वर-पाचगणी परिसरात कार्यकर्त्यांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ​भाजप महिला मोर्चाच्या वतीने यंदाच्या वर्षासाठी

भिलारमध्ये स्व. भि. दा. भिलारे गुरुजींचा स्मृतीवंदन सोहळा संपन्न; विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठी उपस्थिती!

पाचगणी न्यूज नेटवर्क  पांचगणी : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार आणि सामाजिक क्षेत्रातील दीपस्तंभ स्वर्गीय भि. दा. भिलारे गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भिलार येथे त्यांना भावपूर्ण आणि विनम्र अभिवादन करण्यात आले. भिलार येथील ‘भि. दा. भिलारे गुरुजी स्मारक’ येथे भिलारे गुरुजी स्मारक समितीच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रांतील राजकीय, सामाजिक

अखिल भारत हिंदू महासभेच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी भिलारचे समाजसेवक तुषार भिलारे यांची नियुक्ती

पांचगणी न्यूज नेटवर्क ​भिलार : सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याच्या जोरावर स्वतंत्र ठसा उमटवणारे सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध समाजसेवक श्री. तुषार विनायक भिलारे यांची अखिल भारत हिंदू महासभेच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत त्यांना ही नवी जबाबदारी सोपवण्यात आली.