’अवंतिका’ जिल्हा असेंब्लीत पाचगणी इनर व्हील क्लबचा डंका; अध्यक्षा अंजना पारठे यांना ‘प्रेसिडेंट अवॉर्ड’
पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: समाजसेवा, महिला सक्षमीकरण आणि विविध लोकोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून महाबळेश्वर-पाचगणी परिसरासह सातारा जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘इनर व्हील क्लब ऑफ पाचगणी’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. क्लबच्या अध्यक्षा सौ. अंजना राजेंद्र पारठे यांच्या गतिमान नेतृत्वाची जिल्हास्तरावर दखल घेतली गेली असून, त्यांना अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘प्रेसिडेंट अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. पुणे…