काळाचा घाला! महाबळेश्वर-मेढा रस्त्यावर एसटीची दुचाकीला धडक; टेकवलीचे व्यावसायिक नरेश भोंडेकर जागीच ठार
पांचगणी न्यूज नेटवर्क महाबळेश्वर : महाबळेश्वर-मेढा मुख्य रस्त्यावरील माचूतर गावाच्या हद्दीत शनिवारी दुपारी एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. महाबळेश्वरहून साताऱ्याकडे जाणाऱ्या एसटी बस आणि समोरून येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार आणि महाबळेश्वरमधील मोबाईल व्यावसायिक नरेश रमेश भोंडेकर (वय ४५, रा. टेकवली) यांचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे…