वाई-पसरणी रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास थरार; संशयित पोलिसांच्या जाळ्यात, मोठा अनर्थ टळला
पांचगणी न्यूज नेटवर्क /चंद्रकांत भोई वाई : अंधाराचा फायदा घेत मालमत्तेविरुद्ध काहीतरी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत संशयिताला वाई पोलिसांनी अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आहे. वाई ते पसरणी जाणारे रस्त्यावरील सिद्धनाथवाडी हद्दीत ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे परिसरात घडणारा एक मोठा गुन्हा टळल्याची चर्चा असून याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…