उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय स्पर्धेत महाबळेश्वरच्या कृष्णा पवारची सुवर्णकामगिरी! ५२ किलो वजनी गटात पटकावले सुवर्ण पदक
पांचगणी न्यूज नेटवर्क महाबळेश्वर : कडवी आव्हाने, तीव्र स्पर्धा आणि जिद्दीच्या जोरावर महाबळेश्वरच्या कन्या कु. कृष्णा प्रमोद पवार हिने राष्ट्रीय स्तरावर आपल्या क्रीडा कौशल्याचा डंका वाजवला आहे. उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय विशेष ऑलिम्पिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप’ आणि ‘राष्ट्रीय सीनियर पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप’ स्पर्धेत ५२ किलो वजनी गटात अफाट कामगिरी करत कृष्णाने सुवर्ण पदकावर…