खिंगर केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद शाळा पांगारी येथे उत्साहात संपन्न; पर्यावरणपूरक स्वागताने जिंकली उपस्थितांची मने
पाचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : शिक्षण ही केवळ पुस्तकी ज्ञानापुरती मर्यादित न राहता ती निसर्गाशी जोडली गेली पाहिजे, या उदात्त विचारातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पांगारी येथे गुरुवारी (दि. २४ सप्टेंबर) आयोजित करण्यात आलेली ‘केंद्र खिंगर शिक्षण परिषद’ अत्यंत खेळीमेळीच्या, आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शैक्षणिक मंथनासोबतच पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देणाऱ्या या…