Home » कराड » विजेचा धक्का लागून बेलवडेतील ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

विजेचा धक्का लागून बेलवडेतील ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 

पांचगणी न्यूज नेटवर्क

कराड : – कराड तालुक्यातील बेलवडे बुद्रुक येथील एका ५० वर्षीय व्यक्तीचा विजेचा धक्का लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुरेश दिनकर पवार (वय ५०) रा. बेलवडे बुद्रुक, ता. कराड असे मृताचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बेलवडे बुद्रुक, ता. कराड येथील सुरेश पवार यांना विजेचा धक्का लागल्याने गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी घोषित केले. याबाबत कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers