Home » पांचगणी » सिद्धार्थनगर अंगणवाडीत लहानग्यांना शालेय साहित्याचे वाटप; नगरसेविका स्वाती कांबळे यांचा स्तुत्य उपक्रम

सिद्धार्थनगर अंगणवाडीत लहानग्यांना शालेय साहित्याचे वाटप; नगरसेविका स्वाती कांबळे यांचा स्तुत्य उपक्रम

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पांचगणी : आपल्या सभोवतालच्या समाजातील वंचित आणि आर्थिकदृष्ट्या गरीब घटकांना मदतीचा हात मिळावा आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपला उपयोग व्हावा, या उदात्त भावनेतून पांचगणी नगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष नगरसेविका स्वाती कांबळे यांनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. महाबळेश्वर-पांचगणी परिसरातील शैक्षणिक व सामाजिक चळवळीला गती देत, त्यांच्या वतीने एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत सिद्धार्थ नगर पांचगणी येथील अंगणवाडीतील चिमुरड्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

​शिक्षणाची पहिली पायरी असलेल्या अंगणवाडीतील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी आणि पालकांवरील आर्थिक भार हलका व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित बालकांना दर्जेदार स्कूल बॅग, आकर्षक वॉटर बॉटल, रेखाटनाची आवड निर्माण व्हावी म्हणून ड्रॉइंग बूक व कलर्स, तसेच कंपास बॉक्स आणि खाऊचे वाटप करण्यात आले. नवीन शैक्षणिक साहित्य हातात पडताच लहानग्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

​याप्रसंगी स्वतः नगरसेविका स्वाती कांबळे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने गौतम कांबळे, अशोक कांबळे, पंढरीनाथ सोनावणे, अशोक चव्हाण, प्रकाश खरात, दिलीप कांबळे, आशिष ललवाणी आणि भारती कांबळे यांनी उपस्थित राहून मुलांचा उत्साह वाढवला. तसेच अंगणवाडी शिक्षिका गौरी सपकाळ व आरती टेके यांनी या उपक्रमाचे नियोजन केले.

​स्वाती कांबळे यांनी नगरसेविका म्हणून नेहमीच प्रभागाच्या विकासासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्यावर भर दिला आहे. त्यांच्या या संवेदनशील आणि लोकउपयोगी उपक्रमाचे सिद्धार्थनगर परिसरातील नागरिकांमधून आणि संपूर्ण पांचगणी शहरातून उत्स्फूर्त कौतुक होत आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers