Home » कराड » नोकरीचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणारा अटकेत

नोकरीचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणारा अटकेत

 

पांचगणी न्यूज नेटवर्क
कराड  ः वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोमध्ये शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत बनावट कागदपत्रांच्या आधारे लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपीला कराड तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. या प्रकरणात आरोपीने एका नव्हे तर अनेक व्यक्तींना गंडा घातल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी तपासाचा वेग वाढविला आहे.
जिवन तानाजी पवार (वय 29, रा. उत्तर कोपर्डे, ता. कराड, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदाराला स्वतःला वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोमध्ये नोकरी असल्याचे भासवून तसेच शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत आरोपीने वेळोवेळी लाखो रुपये स्वीकारले. यासाठी बनावट शिक्के, अधिकाऱ्यांची खोटी नावे, बनावट पोस्टिंग ऑर्डर व अन्य कागदपत्रांचा वापर करून सुमारे 9 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व कराड तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून जिवन पवार याला अटक केली.
प्राथमिक तपासात आरोपीने अशाच प्रकारे अनेक नागरिकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न होत असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक साक्षात्कार पाटील करीत आहेत.
दरम्यान, याच आरोपीकडून किंवा अन्य कोणाकडून शासकीय नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक झाली असल्यास नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता कराड तालुका पोलीस ठाण्यात संपर्क साधून तक्रार नोंदवावी, तसेच शासकीय नोकरीच्या नावाखाली पैशांची मागणी करणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील आणि पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साक्षात्कार पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार सचिन निकम, किरण बामणे, प्रफुल्ल गाडे, विजय यादव, सूरज चिंचकर यांनी केली.
Show quoted text

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers