Home » कराड » उंडाळे नजीक अपघातात एक ठार, एक जखमी

उंडाळे नजीक अपघातात एक ठार, एक जखमी

पांचगणी न्यूज नेटवर्क

उंडाळे : कराडहुन देवरुखकडे जाणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एक ठार तर एकजण जखमी झाला. कराड- चांदोली रोडवर लोहारवाडी (येणपे) ता. कराड गावच्या हद्दीत रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

पांडुरंग विठ्ठल हिनुकले (वय ५०, गणेशवाडी, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. तर शंकर दादू हिनुकले हे गंभीर जखमी झाले आहे. जखमी हिनुकले यांच्यावर कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रविवारी दुपारी पांडुरंग हिनुकले व शंकर हिनुकले हे दोघेजण दुचाकीवरून शेडगेवाडीकडे निघाले होते. येणपे लोहारवाडी गावचे हद्दीत हॉटेल महाराजासमोर ते अचानक वळले तेंव्हाच मागून येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत पांडुरंग हिनुकले यांचा जागीच मृत्यू झाला. तर शंकर हिनुकले हे गंभीर जखमी झाले. अपघातात कार व दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी कारचालक अशोक हरिश्चंद्र भालेकर (रा. देवरुख) यांच्या विरोधात फिर्याद देण्यात आली आहे. अधिक तपास कराड तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याचे वाहतूक विभाग प्रमुख फौजदार सतीश जाधव व हवालदार प्रशांत जाधव हे तपास करत आहेत.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers