Home » भिलार » अखिल भारत हिंदू महासभेच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी भिलारचे समाजसेवक तुषार भिलारे यांची नियुक्ती

अखिल भारत हिंदू महासभेच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी भिलारचे समाजसेवक तुषार भिलारे यांची नियुक्ती

पांचगणी न्यूज नेटवर्क

​भिलार : सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याच्या जोरावर स्वतंत्र ठसा उमटवणारे सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध समाजसेवक श्री. तुषार विनायक भिलारे यांची अखिल भारत हिंदू महासभेच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत त्यांना ही नवी जबाबदारी सोपवण्यात आली.

​तुषार भिलारे यांनी आजवर सातारा जिल्हा आणि प्रामुख्याने ग्रामीण भागात शैक्षणिक उन्नती आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये हिररीने भाग घेतला आहे. त्यांच्या याच निस्पृह सेवाभावाची आणि नेतृत्वाची दखल घेऊन संघटनेने त्यांच्या खांद्यावर ही मोठी जबाबदारी दिली आहे. या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील महासभेच्या कार्याला आणि संघटनात्मक बांधणीला मोठी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

​नवी दिल्लीतील या कार्यक्रमाला महासभेचे राष्ट्रीय संरक्षक श्री श्री १००८ जगद्गुरु स्वामी माधवानंद सरस्वती जी महाराज, कार्यकारी अध्यक्ष श्री. योगेंद्र वर्मा जी, वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष कु. वैभवराज शिवाजी रौंदळ, राष्ट्रीय महामंत्री डॉ. सिद्धार्थ भट्टाचार्य, राष्ट्रीय कोषाध्यक्ष सौ. साक्षी वर्मा जी, तसेच महामंत्री आचार्य अजय कृष्ण शास्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती.

​याशिवाय राष्ट्रीय धर्म प्रचारक योगी दादानाथ जी गुरु सुखनाथ जी, योगी महंत शिवनाथ जी महाराज, बाल योगी ऋषिकेश नाथ जी महाराज, प्रकाशनाथ जी महाराज, योगी शीतलनाथ जी, योगी सुंदरनाथ जी, महंत सच्चिदानंद सरस्वती जी महाराज, महंत योगानंद सरस्वती जी, महंत किशोरानंद सरस्वती जी महाराज आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. त्यागी आदी साधु-संतांचे आशीर्वाद या प्रसंगी लाभले.

​यासोबतच महाराष्ट्र राज्य प्रभारी सौ. राणीताई पवार, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भावेश पाटील, महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा सौ. आरती राजपूत, कर्नाटक राज्य प्रदेश प्रभारी अशोक कुमार नानू राठोड जी, महाराष्ट्र राज्य मीडिया विभाग उपाध्यक्ष विष्णू भाऊ बिचकुले, श्री. लक्ष्मीकांत (भाऊ) शिंदे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉ. राहुल पवार, पालघर जिल्हा अध्यक्षा सौ. प्रिया शंकर राव, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. सागर निंबाळकर जी, महाराष्ट्र राज्य सदस्य ॲड. दिनेश माळी, नाशिक शहर अध्यक्ष ॲड. अंकित वाघ, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष ॲड. पूनम गांगुर्डे, उपाध्यक्ष पुनीत गोयल, विधी विभाग उत्तर प्रदेश अध्यक्ष रवीं. ब्रिज भूषण, पूनम पिंगळे, श्री. अर्जुन मेदनकर जी यांच्यासह देशभरातील व राज्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​तुषार भिलारे यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सातारा, पाचगणी परिसरासह संपूर्ण जिल्ह्यातून, तसेच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध स्तरांतील मान्यवरांकडून कौतुक व अभिनंदन होत आहे. आगामी काळात हिंदू महासभेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, अशी प्रतिक्रिया भिलारे यांनी या नियुक्तीनंतर दिली.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers