पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : पांचगणी शहरातील कापड व्यवसायातील प्रसिद्ध व्यापारी श्रीनिवास बोधे यांच्या धर्मपत्नी तथा रोटरी क्लब ऑफ पांचगणीचे विद्यमान अध्यक्ष अमित बोधे आणि माजी अध्यक्ष भूषण बोधे यांच्या मातोश्री श्रीमती सुनंदा श्रीनिवास बोधे यांचे दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पांचगणी शहर व परिसर आणि व्यापारी वर्गात शोककळा पसरली. बोधे कुटुंबियांचे शहराच्या व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान राहिले आहे. सुनंदाताई यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर पांचगणी येथील वैकुंठधामात (स्मशानभूमीत) शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी शहरातील विविध क्षेत्रांतील नागरिक, व्यापारी, राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून बोधे कुटुंबाचे सांत्वन केले व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.



