आषाढी एकादशीनिमित्त ज्ञानगंगा हायस्कूलमध्ये दिमाखदार वारी सोहळा; विद्यार्थ्यांसह पालक-शिक्षकांचाही उत्स्फूर्त सहभाग
पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त ज्ञानगंगा हायस्कूलमध्ये वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने भव्य वारी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. लहानग्या विद्यार्थ्यांपासून शिक्षक आणि पालकांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतल्याने संपूर्ण शाळा परिसर विठ्ठलनामाच्या गजराने आणि भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून…