Home » भिलार » भिलारच्या वैभवात भर; अत्याधुनिक उपकरणांसह ‘श्रीराम फिटनेस’चा शुभारंभ ​युवा नेते नितीन भिलारे यांच्या हस्ते उद्घाटन; पुस्तकाच्या गावात आरोग्याचा नवा अध्याय

भिलारच्या वैभवात भर; अत्याधुनिक उपकरणांसह ‘श्रीराम फिटनेस’चा शुभारंभ ​युवा नेते नितीन भिलारे यांच्या हस्ते उद्घाटन; पुस्तकाच्या गावात आरोग्याचा नवा अध्याय

पांचगणी न्यूज नेटवर्क

​भिलार : जागतिक पटलावर ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून नावारूपाला आलेल्या भिलारमध्ये आता आरोग्यदायी आणि सुदृढ पिढी घडवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. गावातील तरुणाईला उत्तम शरीरसौष्ठव आणि फिटनेससाठी शहराच्या ठिकाणी धाव घ्यावी लागू नये, या उद्देशाने स्थानिक युवकांनी एकत्र येत ‘श्रीराम फिटनेस’ या अत्याधुनिक व जागतिक दर्जाच्या सुविधांनी सज्ज अशा व्यायामशाळेची (जिम) उभारणी केली आहे. या भव्य उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच युवा नेते व उद्योजक नितीन भिलारे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.

​फित कापून व्यायामशाळेचे लोकार्पण करताना नितीन भिलारे यांनी तरुणांच्या या संकल्पनेचे विशेष कौतुक केले. आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल युगात प्रत्येकाने शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भिलारच्या युवकांनी क्रीडा संस्कृती जपत आणि आरोग्याचे महत्त्व ओळखून गावातच एवढी उत्कृष्ट जिम सुरू केली आहे, हा उपक्रम संपूर्ण परिसरासाठी अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

​शहरातील महागड्या जिमप्रमाणेच भिलारमध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या या व्यायामशाळेत आर.एस.एफ. (डायनामिक सिरीज) च्या अत्याधुनिक मशीन्स बसवण्यात आल्या आहेत. यामध्ये स्नायू बळकटीकरणासाठी पेक डेक, लेग कर्ल, लेग एक्स्टेंशन, लेग प्रेस, हाय लॅट पुल डाऊन विथ रोविंग, फंक्शनल ट्रेनर, स्मार्ट स्मिथ, स्क्वॉट रॅक, हायपर एक्स्टेंशन, प्रिचर बेंच, ॲडजस्टेबल बेंच, लेग रेझर, सीटेड काफ मशीन, रिस्ट कर्ल आणि इनक्लाइन टी-बार यांसारख्या साधनांचा समावेश आहे. तसेच सुरक्षेसाठी १० मिमीची विशेष रबर मॅटिंग आणि विविध वजनांच्या वेट प्लेट्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

​या उदघाटन सोहळ्यास राजेंद्र आबा भिलारे, कृष्णा भिलारे, शेखर भिलारे, रोहित भिलारे, राजेश गावडे, सचिन काटकर, प्रज्वल भिलारे, रूपक भिलारे, साहील भिलारे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर, ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भिलार व परिसरातील युवकांना एकाच छताखाली आधुनिक उपकरणे आणि योग्य मार्गदर्शनाची सोय उपलब्ध झाल्याबद्दल ग्रामस्थांनी आयोजकांचे कौतुक केले

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers