Home » महाबळेश्वर » शिवसेना महिला आघाडीची धुरा सौ. वर्षाताई आरडे यांच्याकडे; सातारा-जावली उपजिल्हा प्रमुखपदी निवड

शिवसेना महिला आघाडीची धुरा सौ. वर्षाताई आरडे यांच्याकडे; सातारा-जावली उपजिल्हा प्रमुखपदी निवड

पांचगणी न्यूज नेटवर्क

महाबळेश्वर : शिवसेना महिला आघाडीच्या संघटन वाढीसाठी आणि सामाजिक कार्यात महिलांचा सहभाग अधिक प्रभावी करण्यासाठी सौ. वर्षाताई किरण आरडे यांची सातारा-जावली उपजिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सातारा आणि जावली तालुक्यातील महिला कार्यकर्त्यांमध्ये तसेच राजकीय वर्तुळात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

​एका विशेष आणि उत्साहपूर्ण सोहळ्यात सौ. वर्षाताई आरडे यांना हे अधिकृत नियुक्तीपत्र सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख सौ. रेशमाताई जगताप, वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सह-संपर्कप्रमुख अनिलजी मोरे, सातारा जिल्हा प्रमुख सौ. विद्याताई बर्गे आणि जिल्हा संघटक सौ. प्रियाताई नलावडे यांच्या शुभहस्ते वर्षाताईंना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

​या नियुक्ती सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे संपूर्ण सातारा जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची झालेली भक्कम उपस्थिती. संपूर्ण जिल्ह्यातील महिला आघाडीच्या अभूतपूर्व उपस्थितीमुळे सातारच्या राजकीय वर्तुळात महिला शक्तीचा वाढता प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. उपस्थित मान्यवरांनी वर्षाताईंच्या आजवरच्या संघटनात्मक कौशल्याचे व पक्षनिष्ठेचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

​आपल्या निवडीनंतर बोलताना सौ. वर्षाताई आरडे यांनी पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा निर्धार व्यक्त केला. जावली व सातारा परिसरातील महिलांच्या समस्या मार्गी लावणे, आरोग्य व वैद्यकीय मदतीचे जाळे तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि शिवसेनेची ध्येयधोरणे घरोघरी पोहोचवून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

​जावली आणि सातारा परिसरात आधीपासूनच वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून सामाजिक कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. आता वर्षाताई आरडे यांच्या निवडीमुळे महिला आघाडीला नवी ऊर्जा मिळाली असून, आगामी काळात विविध लोककल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातून तळागाळातील घटकांना न्याय मिळवून देण्याचा मानस व्यक्त केला जात आहे. या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतून सौ. वर्षाताई आरडे व किरण आरडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers