Home » वाई » वाईत बेकायदेशीर गोमांस विक्रीचा पर्दाफाश; रविवार पेठेत पोलिसांची कारवाई, एकावर गुन्हा दाखल

वाईत बेकायदेशीर गोमांस विक्रीचा पर्दाफाश; रविवार पेठेत पोलिसांची कारवाई, एकावर गुन्हा दाखल

पांचगणी न्यूज नेटवर्क /चंद्रकांत भोई 

वाई : शहर आणि परिसरात बेकायदेशीर प्राण्यांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्यांविरोधात वाई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रविवार पेठ येथे राहत्या घरात बेकायदेशीरपणे प्राण्यांची कत्तल करून गोसदृश्य मांसाची विक्री करणाऱ्या एका संशयितावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. २१ ऑगस्ट) दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास करण्यात आली.

​याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाई शहरातील रविवार पेठ येथील घर क्रमांक २०८८ मध्ये बेकायदेशीरपणे प्राण्यांची कत्तल करून मांस विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सिद्धनाथवाडी येथील रहिवासी अभय धनंजय शिंदे (वय २२) यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना अवगत केले. आरोपी समि अहमद अन्सार चौधरी (रा. २०८८, रविवार पेठ, वाई) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोणताही परवाना नसताना राहत्या घराच्या पुढच्या खोलीत प्राण्यांची बेकायदेशीर कत्तल करून गोसदृश्य मांसाची विक्री करताना रंगेहात मिळून आला.

​अभय शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाई पोलीस ठाण्यात आरोपी समि अहमद अन्सार चौधरी याच्याविरोधात ‘महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६’ चे कलम ५ (सी) आणि ९ (ए) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक २३४/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​घटनेची माहिती मिळताच वाई पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पुढील कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार पाटणकर (बकल नंबर ९२०) हे करत असून, महिला पोलीस अंमलदार शेंडे यांनी गुन्हा दाखल करण्याची कारवाई पार पाडली. शहरात चालणाऱ्या अशा बेकायदेशीर कत्तलखान्यांवर पोलिसांनी अधिक कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers