जिद्दीचा नवा इतिहास! साताऱ्याचे १०० टक्के अंध सुजित शिंदे बनले महाराष्ट्राचे पहिले अंध शिक्षणाधिकारी; वाचा प्रेरणादायी प्रवास
पांचगणी न्यूज नेटवर्क सातारा : “दृष्टी जरी हिरावली असली, तरी ध्येयाचा प्रकाश कुणीही हिरावू शकत नाही,” हे आपल्या असामान्य कर्तृत्वाने सिद्ध करत साताऱ्याचे सुजित रमाकांत शिंदे यांनी थेट शिक्षणाधिकारी (योजना) पदाला गवसणी घातली आहे. शंभर टक्के अंधत्व, गरिबीची झळ आणि परिस्थितीचा अथांग अंधार छेदत त्यांनी रचलेला हा इतिहास आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रचंड प्रेरणादायी ठरत आहे….