Home » सातारा » साताऱ्यातील चिंचणी गावचा जवान रोहित पवार शहीद

साताऱ्यातील चिंचणी गावचा जवान रोहित पवार शहीद

पांचगणी न्यूज नेटवर्क /मोहन जगताप

सातारा : सातारा जिल्ह्यातील चिंचणी ता. सातारा येथील जवान रोहित रामचंद्र पवार (वय 36) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रोहित हे सन 2009 साली आर्मीमध्ये रुजू झाली असून ते सध्या उत्तर प्रदेशमधील झासी येथे 114 आरमाड इंजिनियर रेजिमेंट या फौजमध्ये नाईक या पदावर कार्यरत होते. ऑनड्युटी असताना ते हृदयविकाराने शहीद झाले. त्यांचे वडील व दोन्ही बंधू हे आर्मीमधून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांचे सर्व कुटुंबीय देशसेवेत कार्यरत असून मोठे बंधू सध्या पोलीसमध्ये रुजू झाले आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. आज दुपारी त्यांचे पार्थिव दाखल होणार असून चिंचणी येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण मंडळाचे वतीने प्रांताधिकारी आशिष बारकूल यांच्या नियोजनात तहसीलदार समीर यादव व निवासी नायब तहसीलदार प्रशांत कदम यांनी दिली

अंत्यसंस्कार शुक्रवारी दुपारी 3 वाजता चिंचणी या मुळ गावी वेण्णा नदीवर शासकीय इतमामात होणार आहे

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers