पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप
वाई दि: दक्षिण काशी समजणाऱ्या वाई मध्ये सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना तथा मनसेमध्ये अनेक तरुणांनी प्रवेश करून आदरणीय राज साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा विडा उचलला. पुन्हा एकदा मनसेचा झेंडा फडकवल्याने वाई तालुक्यातील राजकारणामध्ये मनसेचा प्रभाव दिसून येणार आहे.
मनसे सातारा जिल्हा प्रमुख युवराज पवार यांनी मोठ्या प्रमाणात मनसेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला आहे. महायुतीच्या सरकारमध्ये युवक व तरुणांचा भ्रमनिरास झालेला आहे. विकासाच्या नावाने पक्षांतर करून काहींनी सत्तेची ऊब पदरात पाडून घेतली. पण, सातारा जिल्ह्याच्या विकासाचा बॅकलॉग कुणालाही भरता आलेला नाही. मनसेने जातीधर्माच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांसाठी लढा उभारला आहे. अनेकांना अन्याय झाल्यानंतर मनसे पक्ष आठवतो. हेच या पक्षाचा खरा गुणधर्म आहे. आज सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील अनेक तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा जिल्हा संपर्कप्रमुख श्री गणेश आप्पा सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व मनसे सातारा जिल्हाध्यक्ष श्री युवराज पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षप्रवेशाचा सोहळा पार पाडला.
यावेळी वाई विधानसभा अध्यक्ष श्री मयूर नळ, श्री संजय गायकवाड, श्री अमोल गरड, श्री सौरभ झेंडे, श्री सनी काकडे या सातारा जिल्ह्यातील व वाईट तालुक्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी मनसेत प्रवेश केलेल्या अनेक मान्यवरांचे मनापासून स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
२००६ रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्क या ठिकाणी मनसेची स्थापना केली मराठी माणसाचे हक्क, मराठी भाषा आणि भूमीपुत्रांच्या विकासाला प्राधान्य देण्यासाठी त्यांनी मनसे सैनिक तयार केले आहेत.
राज्याबाहेरून येणाऱ्या परप्रांतीयांनी येथील भूमिपुत्रांचा रोजगार हिसकावून घेतलेला आहे. त्याबाबत महायुतीचे धोरण व नियंत्रण फसवे निघाले आहे. दुकानांवर मराठी पाट्या अनिवार्य करणे आणि शाळांमध्ये मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करणे हाच मनसेचा मुख्य उद्देश असून तो सफल झाला आहे.
२००९ साली मनसेच्या स्थापनेनंतर १३ आमदार महाराष्ट्रातून निवडून आले होते.२०२९ साली मनसेचे किमान ५० आमदार निवडून येतील अशी राजकीय परिस्थिती असल्याचे सातारा मनसे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी सांगितले. २०१२ च्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीत मनसेने अभूतपूर्व यश मिळवत अडीच नगरसेवक विजयी करून सत्ता स्थापन केली होती याशिवाय मुंबई, पुणे, ठाणे येथेही पक्षाचे नगरसेवक निवडून आले होते.
आदरणीय मनसे प्रमुख राज साहेब ठाकरे यांच्यासोबत मनसेचे नितीन सरदेसाई, बाळ नांदगावकर, संदीप देशपांडे यांसारखे प्रमुख नेते राज ठाकरे यांच्यासोबत पक्षाची धुरा सांभाळत आहेत. मनसे पक्ष महाराष्ट्रात आपला प्रभाव टिकवून ठेवत आहे. सातारा जिल्ह्यातही सातारा जिल्हा प्रमुख युवराज पवार त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाढवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.



