
कराड हादरले! कौटुंबिक वादातून पत्नीनेच दिली अभियंत्या पतीच्या खुनाची सुपारी; अपघाताचा बनाव रचणारा मेहुण्यासह पोलिसांच्या जाळ्यात
पांचगणी न्यूज नेटवर्क कराड: वैवाहिक जीवनातील कलहाने एका सुशिक्षित कुटुंबाचा कसा भयानक अंत होतो, याचा थरारक अनुभव कराड शहरात पहायला मिळाला आहे. जलसंपदा विभागातील एका ५४ वर्षीय अभियंत्याची भररस्त्यात वाहनाने चिरडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हा कोणताही अपघात नसून, पत्नीनेच आपल्या भावाच्या मदतीने मुंबईतून दोन कॉन्ट्रॅक्ट किलर्सना सुपारी












