
राजपुरीचा सुयोग राजपुरे पहिल्याच प्रयत्नात झाला ‘सीए’; खा. नितीनकाका पाटील यांच्यासह मान्यवरांकडून कौतुक
पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ (ICAI) च्या वतीने घेण्यात आलेल्या अत्यंत अवघड अशा चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील राजपुरी गावचा सुपुत्र सुयोग गजानन राजपुरे याने आपल्या देदीप्यमान बुद्धिमत्तेच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करून ‘सीए’ पदवीला गवसणी घातली आहे. त्याच्या या












