Home » भिलार » हिलरेंज माध्यमिक विद्यालयाच्या मुलींची कबड्डीत गरुडझेप; तालुकास्तरीय स्पर्धेत विजेतेपद पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेत धडक!

हिलरेंज माध्यमिक विद्यालयाच्या मुलींची कबड्डीत गरुडझेप; तालुकास्तरीय स्पर्धेत विजेतेपद पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेत धडक!

पांचगणी न्यूज नेटवर्क 

​भिलार : सातारा जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात हिलरेंज माध्यमिक विद्यालय, भिलारच्या मुलींच्या संघाने आपल्या उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर दिमाखदार विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी ज्ञानगंगा हायस्कूलच्या संघावर मात करत हिलरेंजच्या मुलींनी जिल्हास्तरीय स्पर्धेतील आपले स्थान पक्के केले. या विजयासोबतच संघातील गार्गी जाधव हिची उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आल्याने भिलारच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

​पाचगणी येथील महात्मा फुले हायस्कूलच्या क्रीडांगणावर २१ सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत महाबळेश्वर तालुक्यातील अनेक नामांकित शाळांच्या संघांनी सहभाग घेतला होता. सुरुवातीच्या सामन्यांपासूनच हिलरेंज माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंनी मैदानावर उत्तम समन्वय, आत्मविश्वास, कडक शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर आपला वरचष्मा कायम ठेवला. अंतिम सामन्यात हिलरेंजच्या मुलींनी आक्रमक आणि कौशल्याने परिपूर्ण खेळ करत ज्ञानगंगा हायस्कूलच्या संघाचा पराभव केला आणि विजेतेपदाच्या चषकावर आपले नाव कोरले.

​स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्राचार्य दिगंबर मिरजापुरे, भगवानसिंग राजपूत, राहुल कांबळे आणि राज्यपंच आकाश माने यांच्या शुभहस्ते विजेत्या संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या यशामध्ये संघाच्या व्यवस्थापक विनायक बगाडे, संगीता खरात आणि सुजाता पारठे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या अहोरात्र मेहनतीला आणि मार्गदर्शकांच्या अचूक रणनीतीला या विजयाने योग्य न्याय दिला आहे.

​विद्यार्थिनींच्या या ऐतिहासिक यशाबद्दल हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन भिलारे, सचिव जतीन भिलारे, संचालिका डॉ. तेजस्विनी भिलारे, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकुंद शिंदे, नंदकुमार शिंदे, शांताराम जाधव, कल्पेश गायकवाड, राजू मोरे, संतोष मालुसरे, योगिता रांजणे, एस. बी. भगत आदी शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी विजेत्या खेळाडूंचे आणि मार्गदर्शकांचे कौतुक करत पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या यशाने महाबळेश्वर तालुक्यात व विशेषतः भिलार परिसरात हिलरेंज विद्यालयाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers