
वाई तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाचा धडक छापा; विनापरवाना दूध वाहतूक करणारी ६ वाहने जप्त, १२ नमुने तपासणीसाठी पाठवले
पांचगणी न्यूज नेटवर्क वाई : वाई तालुक्याच्या पश्चिम भागात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) एक मोठी आणि धडक कारवाई करत विनापरवाना दूध संकलन व वाहतूक करणाऱ्या तब्बल सहा वाहनांवर एकाच वेळी छापे टाकले. या धडक कारवाईत पथकाने ६ वाहनांमधील दुधाचे एकूण १२ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. या कारवाईमुळे संपूर्ण वाई तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील दूध









