पांचगणी न्यूज नेटवरो
दहिवडी : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला धमकावल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या चिक्या ऊर्फ गणेश दिनकर गायकवाड (रा. दहिवडी, ता. माण) याला वडूज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने १५ वर्षांची सक्त मजुरी आणि ₹६५ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. पोक्सो कायद्यांतर्गत दाखल झालेल्या या खटल्यात सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे व साक्षीदारांचे जबाब ग्राह्य धरून न्यायालयाने हा निकाल दिला.
दहिवडी पोलीस ठाण्यात डिसेंबर २०२१ मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आरोपीने अल्पवयीन मुलीला इमारतीतील रिकाम्या खोलीत नेऊन तिचा विनयभंग केला तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नये, अशी धमकी दिल्याचा आरोप होता. त्यानंतर भारतीय दंड संहिता आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.
Post Views: 455



