Home » जावळी » आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या बदनामीकारक पोस्टमुळे करहर परिसरात संतापाची लाट; दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत पोलिसांना दिले निवेदन

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या बदनामीकारक पोस्टमुळे करहर परिसरात संतापाची लाट; दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत पोलिसांना दिले निवेदन

पांचगणी न्यूज नेटवर्क

करहर : लोकप्रिय नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याबाबत सोशल मीडियावर काही समाजकंटकांनी बदनामीकारक आणि अक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद करहर परिसरात उमटले असून, शिवेंद्रसिंहराजे प्रेमी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. या अनुचित प्रकाराचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी करहर येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले होते.

​महाराज साहेबांवर अथांग प्रेम करणाऱ्या समर्थकांनी या कृत्य करणाऱ्यांचा तीव्र शब्दांत धिक्कार केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक आणि बनावट माहिती पसरवून नेत्यांची प्रतिमा मलीन करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी याप्रसंगी करण्यात आली. यासंदर्भात करहर पोलीस स्टेशनला एक निवेदन सादर करून पोलिसांचे लक्ष वेधण्यात आले.

या निषेध सभेत व निवेदन देण्याच्या प्रसंगी परिसरातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये उपसभापती गोरखनाथजी महाडिक, सरपंच परिषदेचे समाधानजी पोफळे, शिवेंदरसिंहराजे भोसले यांचे स्वीय सहाय्यक नितीन गावडे, किसान सेनेचे उपाध्यक्ष राजू महाडिक, रणजीत शिंदे, राजेंद्रजी गोळे, भाजपा सरचिटणीस किरण भिलारे, दिलीप यादव, प्रदीप झेंडे, रांजणीचे सरपंच सुनील सपकाळ, रवीजी गावडे, रुईघरचे सरपंच अंकुश बेलोशे, सचिन पोफळे, अक्षय पोफळे आणि संजय शिंदे यांच्यासह परिसरातील अनेक गावांमधील सरपंच, उपसरपंच व महाराज साहेबांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​निषेधकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, सोशल मीडियाचा गैरवापर करून लोकनेत्यांची बदनामी करण्याचे कारस्थान तातडीने थांबले पाहिजे. सायबर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित खात्यांच्या धारकांवर त्वरित कडक कारवाई करावी, अन्यथा याविरोधात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers