Home » पांचगणी » दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेची ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या मुंबईत ; चेअरमन विक्रम भिलारे यांची माहिती

दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेची ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या मुंबईत ; चेअरमन विक्रम भिलारे यांची माहिती

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पांचगणी : दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेची ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दिनांक २१ जून २०२६ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता डॉ. अँटोनियो डी-सिल्वा हायस्कूल, एस. के. बोले मार्ग, कबूतरखान्याजवळ, दादर (पश्चिम), मुंबई येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष विक्रम भिलारे यांनी दिली आहे. .

 

ही सभा बँकेचे अध्यक्ष (चेअरमन) विक्रम भिलारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून या महत्त्वपूर्ण सभेस बँकेच्या सर्व सन्माननीय सभासदांनी मोठ्या संख्येने व वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वरदास लालवाणी आणि सर्व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

​या ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे एकूण १ ते ११ विषयांवर उपस्थित सभासदांच्या उपस्थितीमध्ये सविस्तर विचारविनिमय करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मागील सभेचे प्रोसिडींग वाचन करणे, नफा-तोटा पत्रकाचे वाचन करणे आणि आगामी वर्षाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे यासह माननीय अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या इतर विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. बँकेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि भविष्यातील नियोजनासाठी ही सभा अत्यंत महत्त्वाची असल्याने सर्व सभासदांनी सभेला आवर्जून उपस्थित राहावे, असे आग्रहाचे आवाहन चेअरमन विक्रम भिलारे व समस्त संचालक मंडळाने केले आहे.

 

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers