राज्यातील पतसंस्थाच्या दैनंदिन ठेव प्रतिनिधींच्या कमिशनमध्ये अर्धा टक्का कपात रद्द; कमिशन पुन्हा ३ टक्के करण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे ३ लाख प्रतिनिधींना मोठा दिलासा, जिजाबा पवार यांच्या यशस्वी पाठपुराव्याला यश
पांचगणी न्यूज नेटवर्क सातारा : राज्यातील नागरी सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचवणाऱ्या दैनंदिन ठेव प्रतिनिधींसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. सहकार आयुक्तांच्या पूर्वीच्या आदेशानुसार करण्यात आलेली अर्धा टक्का कमिशन कपात सरकारने अखेर रद्द केली असून, दैनंदिन ठेव प्रतिनिधींचे कमिशन पुन्हा एकदा पूर्ववत ३ टक्के करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य…