पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी / प्रमोद रांजणे यांजकडून……………..
शहरातीलच नव्हे तर राज्यभरातील दंत रुग्णांना गेली वीस वर्षे दर्जेदार सेवा देणाऱ्या कित्तूरकर डेंटल क्लिनिकच्या नवीन व अत्याधुनिक वास्तूचे उद्घाटन रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. श्री. मकरंद (आबा) पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. यनिमित्ताने…
सेवेची वीस वर्षे: पांचगणीतील दंतचिकित्सेचा जागतिक चेहरा
एखाद्या दुर्गम किंवा छोट्या भागात वैद्यकीय सेवा सुरू करणे आणि ती पुढील दोन दशके सातत्याने यशाच्या शिखरावर ठेवणे, यासाठी केवळ पदवी पुरेशी नसते, तर तिथे गरज असते ती अथांग सेवाभावाची. डॉ. अमर कित्तूरकर यांनी पांचगणीसारख्या निसर्गरम्य पण त्याकाळी दंतोपचारांच्या बाबतीत मर्यादित सुविधा असलेल्या शहरात २००६ मध्ये पाऊल ठेवले. दावणगेरे येथून बीडीएस (BDS) आणि थेट रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथून ऑर्थोडॉन्टिक्समध्ये एमडीएस (MDS) सारखे उच्च शिक्षण घेतलेल्या या तरुण डॉक्टरांकडे मोठ्या शहरात जाऊन गडगंज कमाई करण्याचे अनेक पर्याय खुले होते. मात्र, त्यांनी निवड केली ती पांचगणीची; कारण या भागातील जनतेला साध्या उपचारांसाठीही पुणे, मुंबई किंवा साताऱ्याची वारी करावी लागत होती, हे चित्र त्यांना बदलायचे होते.
सुरवातीचा काळ सोपा नव्हता. जागतिक दर्जाची आयात केलेली महागडी उपकरणे आणि दुसरीकडे सर्वसामान्य रुग्णांना परवडणारे शुल्क, या दोन्ही गोष्टींचा मेळ घालणे हे एक मोठे आव्हान होते. पण, डॉ. कित्तूरकर यांना त्यांच्या कुटुंबाकडून मिळालेला प्रामाणिकपणा आणि सचोटीचा वारसा येथे कामी आला. दंतवैद्यक ही केवळ एक उपचार पद्धती नसून ते कला आणि विज्ञानाचे एक सुंदर मिश्रण आहे, हे त्यांनी आपल्या कौशल्यातून सिद्ध केले.
हळूहळू त्यांच्या हाताळणीतील सौम्यपणा आणि अचूक उपचारांमुळे रुग्णांचा विश्वास वाढत गेला. आज केवळ पांचगणी किंवा महाबळेश्वरच नव्हे, तर पुणे, मुंबई, गुजरात आणि थेट परदेशातूनही अनेक सेलिब्रिटी व प्रतिष्ठित नागरिक कित्तूरकर क्लिनिकमध्ये उपचारासाठी येतात. हा प्रवास केवळ एका डॉक्टरचा राहिला नसून तो या पंचक्रोशीतील जनतेच्या विश्वासाचा सोहळा बनला आहे.
या २० वर्षांच्या यशस्वी वाटचालीनंतर, रुग्णांना अधिक आधुनिक, सुरक्षित आणि गतिमान सेवा देण्यासाठी आता कित्तूरकर डेंटल क्लिनिक एका नव्या, अत्याधुनिक वास्तूमध्ये सज्ज झाले आहे. जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या नवीन क्लिनिकच्या माध्यमातून पांचगणीत भविष्यात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे पॉलीक्लिनिक उभारण्याचे स्वप्न कित्तूरकर परिवाराने बाळगले आहे. ‘विश्वास, गुणवत्ता आणि सेवाभाव’ या त्रिसूत्रीवर आधारलेला हा प्रवास आगामी काळातही अविरत सुरू राहील, यात शंका नाही.
उद्घाटन सोहळा
शहरातीलच नव्हे तर राज्यभरातील दंत रुग्णांना गेली वीस वर्षे दर्जेदार सेवा देणाऱ्या कित्तूरकर डेंटल क्लिनिकच्या नवीन व अत्याधुनिक वास्तूचे उद्घाटन रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. श्री. मकरंद (आबा) पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. जुन्या पोलीस स्टेशनसमोर, जैन मंदिर रोड, पांचगणी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या प्रशस्त व सुसज्ज क्लिनिकमध्ये दंत रुग्णांना अत्याधुनिक, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा व उपचार सेवा उपलब्ध होणार आहेत.



