Home » पांचगणी » नोकरीची सुवर्णसंधी! ‘जावली व महाबळेश्वर तालूक्यातील नामवंत पतसंस्थेत ‘ लिपिक आणि कलेक्शन प्रतिनिधी पदांची भरती; ८ ऑगस्टपर्यंत अर्जाची मुदत

नोकरीची सुवर्णसंधी! ‘जावली व महाबळेश्वर तालूक्यातील नामवंत पतसंस्थेत ‘ लिपिक आणि कलेक्शन प्रतिनिधी पदांची भरती; ८ ऑगस्टपर्यंत अर्जाची मुदत

पांचगणी न्यूज नेटवर्क

पाचगणी: जावली तालुक्यातील दापवडी येथील नामांकित आणि विश्वासार्ह ‘कै. दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, काटवली’ या संस्थेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या स्थानिक गरजू व होतकरू तरुणांसाठी ही एक उत्तम संधी चालून आली आहे.

 

​पतसंस्थेच्या कारभाराचा विस्तार आणि वाढत्या कामाच्या पार्श्वभूमीवर लिपिक (क्लार्क) आणि कलेक्शन प्रतिनिधी या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

​📌 भरती तपशील आणि पात्रता:

​१. क्लार्क (लिपिक)

​एकूण पदे: ०२ (दोन)

वय – 25 ते 30 वर्ष

​शैक्षणिक पात्रता: वाणिज्य शाखेचा पदवीधर (B.Com Graduates)

​विशेष प्राधान्य: बँकिंग किंवा पतसंस्था क्षेत्रातील कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्रथम प्राधान्य दिले जाईल.

​२. कलेक्शन प्रतिनिधी (पिग्मी एजंट)

​शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेचा पदवीधर (Any Graduate)

स्वतःची दुचाकी असावी

​कामकाजाचे स्वरूप: जावली आणि महाबळेश्वर तालुका परिसरात दैनंदिन पिग्मी (बचत) गोळा करण्याचे काम करणे आवश्यक राहील.

​🗓️ अर्ज कसा आणि कधी करावा?

​अंतिम मुदत: ८ ऑगस्ट २०२६ (समक्ष अथवा टपालद्वारे अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख)

 

​अर्ज सादर करण्याचे ठिकाण: कै. दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, मुख्य कार्यालय – दापवडी, ता. जावली, जि. सातारा.

 

​स्थानिक तरुणांना आवाहन:

आपल्याच भागात सन्मानजनक रोजगार मिळवण्याची ही नामी संधी असून, पात्र आणि इच्छुकांनी विहित मुदतीत आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संस्थेच्या मुख्य कार्यालयात समक्ष अथवा टपालाने सादर करावेत, असे आवाहन पतसंस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

संपर्क : 7972416550

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers