महाबळेश्वर-तापोळा मार्गावरील १०५ गावांचा वनवास संपला; लालपरी पुन्हा धावली, नवीन वेळापत्रक जाहीर! : नगराध्यक्ष सुनील. शिंदे आणि नगरसेवक ॲड. संजय जंगम यांचे प्रयत्न यशस्वी
पांचगणी न्यूज नेटवर्क महाबळेश्वर: महाबळेश्वर-तापोळा मुख्य रस्ता खचल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या भागातील १०५ गावांचा महाबळेश्वर तालुक्याशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला होता. रस्ता बंद असल्याने शाळकरी विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत होते. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक पदाधिकारी आणि समाजसेवकांनी तातडीने पावले उचलत प्रशासनाकडे यशस्वी पाठपुरावा केला. परिणामी, या भागातील एसटी…