शाळांमधील अस्वच्छतेचे वास्तव: जावळीत ‘स्वच्छ शाळा’ अभियानाचा फुसका बार; लाखो रुपये खर्चूनही विद्यार्थ्यांची कोंडी
पांचगणी न्यूज नेटवर्क /प्रसन्न पवार कुडाळ : स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ अशा गोंडस घोषणा देऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या गप्पा मारणाऱ्या शिक्षण आणि प्रशासकीय यंत्रणेचा नाकर्तेपणा जावळी तालुक्यात उघडा पडला आहे. तालुक्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी लाखो रुपये खर्चून उभारलेली शौचालये आज दुरवस्थेच्या गर्तेत अडकली आहेत. कुठे दरवाजे तुटलेले, कुठे कड्या-कोयंडे नादुरुस्त, तर कुठे साचलेली प्रचंड घाण आणि…