“पाचगणीचा वाघ शांत झाला…” शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, समाजसेवक अन् अभेद्य आधारस्तंभ अजितभाऊ कासुर्डे यांचे आकस्मित निधन; संपूर्ण परिसरावर शोककळा!
“पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणीच्या सामाजिक, राजकीय अन् क्रीडा क्षेत्रातील एक झंझावाती पर्व आज अचानक शांत झाले. सतत हसरा चेहरा, अंगात लखलखणारा पांढराशुभ्र पेहराव, मनात ओसंडून वाहणारी माणुसकी आणि प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारा सच्चा सखा — अशी ओळख असलेले शिवसेनेचे महाबळेश्वर तालुका प्रमुख, घाटजाई ट्रस्टचे प्रमुख कार्यकर्ते अन् पाचगणी व्यायाम मंडळाचे संचालक श्री. अजितभाऊ (आप्पा) कासुर्डे…