बिरवाडीचा सुपुत्र राष्ट्रीय पातळीवर चमकला; प्रा. श्रीकांत घाडगे ‘नॅशनल टीचर अवॉर्ड’ने सन्मानित
पांचगणी न्यूज नेटवर्क महाबळेश्वर : सप्टेंबर अध्यापनातील नावीन्यपूर्ण प्रयोग आणि शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांना समृद्ध करणारे बिरवाडी (ता. महाबळेश्वर) येथील सुपुत्र प्रा. श्रीकांत तुकाराम घाडगे यांना प्रतिष्ठित ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’ने गौरविण्यात आले आहे. पुणे येथील नामांकित ‘ग्लोबल एलिट (मीडिया अँड टेक)’ या संस्थेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील या उल्लेखनीय आणि प्रेरणादायी…