पाचगणी, महाबळेश्वर परिसरात परप्रांतीय स्पा कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) पाचगणी पोलिसांना निवेदन
पाचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: महाबळेश्वर आणि पाचगणी या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनस्थळांमध्ये परप्रांतीय व परदेशी महिलांचा स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. रात्री-अपरात्री मुख्य बाजारपेठ आणि मार्केट यार्ड परिसरात अशा संशयास्पद हालचाली वाढल्या असून, यामुळे स्थानिक संस्कृती धोक्यात येण्याची तसेच अमली पदार्थांचा (ड्रग्स) शिरकाव होण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर,…