बजाज कंपनी आणि स्वामी मोटर्सकडून गोडवलीतील महिलेची फसवणूक; दुचाकी घेऊनही चार महिने रजिस्ट्रेशन नाही!
पाचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : वाहन खरेदी करून तब्बल चार महिने उलटले, खिशातून पूर्ण पैसे मोजले; पण हातात असलेल्या गाडीचे अधिकृत रजिस्ट्रेशनच झाले नसल्याचा धक्कादायक प्रकार महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथे समोर आला आहे. वाई येथील बजाज चेतकच्या अधिकृत ‘स्वामी मोटर्स’ आणि बजाज कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे गोडवली येथील सौ. प्रमिला चव्हाण या महिला ग्राहकाची मोठी फसवणूक…