‘पुस्तकांचे गाव’ भिलार येथे ३ ऑक्टोबरला राज्य मराठी विकास संस्थेतर्फे भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमाचे मोफत आयोजन
पांचगणी न्यूज नेटवर्क भिलार : मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा आणि तिच्या समृद्ध सांस्कृतिक-वैचारिक वारशाचा गौरव करण्यासाठी ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिल्लारमध्ये एक विशेष सांस्कृतिक सोहळा रंगणार आहे. अभिजात मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने शनिवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता भिल्लार येथील हनुमान मंदिर सभागृहात ‘मराठीचे…