गव्यांच्या उपद्रवाने कांदाटी खोऱ्यातील भातशेती उद्ध्वस्त; प्रलंबित भरपाई तातडीने देण्याची मागणी पंचनाम्यानंतर ३० दिवसांत भरपाई द्या आणि वन्यजीव-शेती संरक्षणाचा विशेष आराखडा आखा : सौरभ मोरे आक्रमक
पांचगणी न्यूज नेटवर्क महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम मानल्या जाणाऱ्या कांदाटी खोऱ्यातील मौजे शिंदीसह संपूर्ण परिसरात गव्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे भातशेती धोक्यात आली आहे. ऐन कापणीच्या आणि पक्वतेच्या काळातच गव्यांचे कळप शेतांमध्ये घुसून उभे भातपीक तुडवून नष्ट करत असल्याने बळीराजा प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. वर्षभराचे कष्ट, महागडी बियाणे, खतांचा खर्च आणि हातातोंडाशी आलेला घास डोळ्यांसमोर…