जिल्हा बँकेत शिवेंद्रसिंहराजेंचा ‘मास्टरस्ट्रोक’; बाबासाहेब कदमांची माघार अन् बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब!
पांचगणी न्यूज नेटवर्क सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकीय पटलावर सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुन्हा एकदा आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीचा आणि सहकारातील वर्चस्वाचा प्रत्यय दिला आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत बाबासाहेब कदम यांनी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवेंद्रसिंहराजेंच्या बिनविरोध निवडीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्यानंतर आता…